
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून नागपूरमध्ये सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावरून शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, अंबादास दानवे यांनीही यावर भाष्य केले आहे. शेकडो कोटी खर्च करायचे आणि ते चार आणि पाच दिवसांचे अधिवेशन करायचे? खरंतर जनतेचे प्रश्न विरोधकांनी मांडू नये, अशीच सरकारची इच्छा आहे आणि म्हणूनच अधिवेशन कसं गुंडाळता येईल, कसं कमी करता येईल असा प्रयत्न करत असल्याची टीका दानवे यांनी केली आहे.
दानवे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री स्वत: विदर्भाचे आहेत. विदर्भात होणारे अधिवेशन हे कशासाठी होते नागपूरला? नागपूर करार कशामुळे झाला होता? विदर्भावर अन्याय होऊ नये म्हणून. त्यात ठरलं होतं की, नागपूरला वर्षातून एकदा अधिवेशन व्हावं. ते काय चार दिवसांचे व्हावे?शेकडो कोटी खर्च करायचे आणि ते चार दिवसांचे आणि पाच दिवसांचे अधिवेशन करायचे. पहिल्या दिवस तर श्रद्धांजली, आदरांजली आणि बिल ठेवण्यातच जात असतो. उरले पाच दिवस. नागपूरला पाचच दिवसांचे अधिवेशन घेतात? खरंतर तुम्हाला जनतेचे प्रश्न विरोधकांनी मांडू नये अशीच तुमची इच्छा आहे आणि म्हणूनच अधिवेशन कसं गुंडाळता येईल, कसं कमी करता येईल.असा प्रयत्न करतात असे म्हणाले.
भास्कर जाधवांनी मला माफ करावं अशी आपली अपेक्षा असल्याचं निलेश राणेंनी स्पष्ट केलं.भास्कर जाधव यांनी मला माफ करावं निलेश राणे यांच्या वक्तव्यावर दानवे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, त्यांचे काय काय माफ करावे हा एक प्रश्न आहे. मागच्या काही काळात काय काय झाले ते सगळ्या कोकणाला माहित आहे. महाराष्ट्राला माहित आहे. आता कबुली देऊन जो बूँद से गई वो हौद से नहीं आती … असे म्हटलंय.



























































