
मुंबईतील लाखो नागरिक सेस इमारती आणि पागडी सिस्टममध्ये राहत असून त्यांच्या पुनर्विकास प्रक्रियेला अलीकडेच मोठा धक्का बसला आहे. कॉम्पिटन्ट ऑथॉरिटी कोण असावे याबाबतचा प्रश्न न्यायालयात उपस्थित झाल्यानंतर ही प्रक्रिया ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर काही जमीन मालक आणि त्यांची लॉबी हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून हा तिढा सोडवावा, अशी विनंती केली आहे. “लोकांचं राहणीमान गंभीर आणि बिकट परिस्थितीत गेलं आहे,” असे त्यांनी सांगितले.
तसेच 2021 मध्ये कामाला सुरुवात झाल्यानंतर पहिला टप्पा पूर्ण झाला असून इमारत उभी आहे. लॉटरी नियमाप्रमाणे पार पडली पाहिजे, परंतु काही राजकीय हस्तक्षेपामुळे अधिकारी दबावाखाली येत आहेत. या प्रक्रियेत जातीय आणि सामाजिक तेढ निर्माण केली जात असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणत सरकारने तातडीने कारवाई करून हा प्रकार थांबवावा, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी विधीमंडळात केली.
मुंबईतील लाखो लोक सेस इमारती वा पागडी सिस्टममध्ये राहतात. त्यांचा पुनर्विकास सुरु होत असतानाच कोर्टात कॉम्पिटन्ट ऑथॉरिटी कोण ह्याविषयी विचारणा करण्यात आली. त्यामुळे लाखो लोकांचं पुनर्विकास थांबला. लँडलॉर्डची लॉबी ह्यामध्ये हस्तक्षेप करू लागली आहे. माझी सरकारला विनंती आहे की हा… pic.twitter.com/YTpwR7nS6o
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 9, 2025
वसतिगृहाची दुरावस्था
वसतिगृह, अभ्यासिकांची आपण जर क्वालिटी पाहिलीत तर तिथे भरारी पथके पाठवून तिथली बाथरूम, कँटीन ठीक आहेत का, पाईप लिकेज आहेत का ह्याची तपासणी व्हायला हवी. तिथल्या सुरक्षेची तपासणी व्हायला हवी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
वसतिगृह, अभ्यासिकांची आपण जर क्वालिटी पाहिलीत तर तिथे भरारी पथके पाठवून तिथली बाथरूम, कँटीन ठीक आहेत का, पाईप लिकेज आहेत का ह्याची तपासणी व्हायला हवी. तिथल्या सुरक्षेची तपासणी व्हायला हवी.
– आदित्य ठाकरे, शिवसेना आमदार@AUThackeray pic.twitter.com/Xnl6Db5J4N
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 9, 2025





























































