
चुकीच्या जीवनशैलीमुळे डिहायड्रेशन तसेच आपण कमी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करु लागलो आहोत. याचबरोबर जंक फूडदेखील आपण बरेच खात आहोत. कमी फायबर सेवन आणि जास्त जंक फूड सेवन यामुळे बद्धकोष्ठता सामान्य आहे. ही समस्या पोटासह शरीरावर परिणाम करू शकते, ज्यामुळे जडपणा, गॅस, आम्लता आणि चिडचिडेपणाची भावना निर्माण होते.
बद्धकोष्ठतेपासून मुक्तता कशी मिळवायची?
दररोज सकाळी रिकाम्या पोटी दोन ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे बद्धकोष्ठतेपासून मुक्तता मिळते. शिवाय, दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी पिल्याने पोट निरोगी राहण्यास मदत होते.
आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा. संपूर्ण धान्य, ओट्स, दलिया, हिरव्या पालेभाज्या आणि सॅलडचे नियमित सेवन केल्याने, पोट स्वच्छ राहण्यास आणि अनेक समस्या टाळण्यास मदत होते.
पपईमध्ये आढळणारे पपेन हे एंजाइम अन्न पचवण्यास मदत करते. बद्धकोष्ठता, अपचन किंवा गॅसचा त्रास असलेल्यांसाठी पपई खाणे खूप फायदेशीर ठरू शकते.
जवसाच्या बियांमध्ये विरघळणारे फायबर असते. यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. त्यांचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. जवस बियांचे नियमित सेवन केल्याने पोट निरोगी राहण्यास मदत होते.























































