
अक्षय खन्ना याच्या दमदार अभिनयाने बॉक्स ऑफिसवर तुफान गर्दी खेचणाऱया ‘धुरंधर’ने जबरदस्त कमाई केली आहे. ‘धुरंधर’ने शाहरुख खानचा ‘पठाण’ आणि या वर्षी सर्वात जास्त गाजलेला ‘सैयारा’ या दोन्ही चित्रपटांना मागे टाकले आहे. ‘धुरंधर’ने सहाव्या दिवशी 26.59 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच ‘धुरंधर’ने देशात एकूण 180 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘पठाण’ची सहाव्या दिवशी कमाई 26.5 कोटी रुपये होती, तर ‘सैयारा’ची 21.5 कोटी रुपये होती. ‘धुरंधर’ची मात्र 26.50 कोटी रुपये कमाई आहे. हिंदुस्थानसह अन्य देशांमध्येही ‘धुरंधर’ला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाने जगभरात एकूण 255 कोटी रुपयांचे कलेक्शन केल्याची माहिती आहे.



























































