
जपानी स्पोर्ट्सवेअर ब्रँड एसिक्सने टाटा मुंबई मॅरेथॉन (टीएमएम) सोबतच्या आपल्या १७व्या वर्षाच्या सहकार्यानिमित्त आज मुंबईत आपला नवीन परफॉर्मन्स रनिंग शू ‘जेल-निंबस™ २८’ चे अनावरण केले. या कार्यक्रमाला अभिनेते आणि फिटनेसप्रेमी डिनो मोरिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. टीएमएम २०२६ साठी प्रमुख मॉडेल म्हणून सादर केलेला ‘जेल-निंबस २८’ हा न्यूट्रल कुशनिंग शू मागील आवृत्तीपेक्षा २० ग्रॅमने हलका आहे. यामुळे धावण्याचा अनुभव अधिक मऊ, हलका आणि सहज बनतो. यासोबतच, एसिक्सने मुंबईच्या ‘कोस्टल रोड’वरून प्रेरित असलेला ‘टीएमएम २०२६ एसएम ग्राफिक टी-शर्ट’ ही मर्यादित आवृत्ती तसेच, उच्च कार्यक्षमतेचे शॉर्ट्स, मेश कॅप आणि सॉक्स यांचा समावेश असलेल्या जर्सीही लॉन्च केल्या




























































