
कर्मचाऱयांना लवकरच एटीएम आणि यूपीआयमधून थेट पीएफचे पैसे काढता येणार आहेत. मार्चच्या आधी पीएफला यूपीआयशी लिंक करण्याच्या प्रक्रियेवर काम पूर्ण होईल. त्यानंतर कर्मचाऱयांना एटीएममधून पैसे काढता येतील, असे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितले.
पीएफ काढण्याची सध्याची प्रक्रिया एवढी किचकट आहे की, कर्मचारी फॉर्म भरून थकून जातात. म्हणूनच सरकारने ही प्रक्रिया सोपी आणि जलद करायचे ठरवले आहे. हळूहळू नियमांमध्ये बदल केला जातोय. पीएफची 75 टक्के रक्कम कोणत्याही कारणाशिवाय काढता येते. उर्वरित 25 टक्के काढता येत नाही. कारण कर्मचाऱयांच्या नोकरीत सातत्यता हवी असते. मार्च महिन्याच्या आतच कर्मचाऱयांनी पीएफची रक्कम एटीएम किंवा यूपीआयच्या माध्यमातून काढता येईल. पीएफची खाती याआधी बँक खाती, आधार किंवा यूएएनसोबत जोडलेली आहेत. आता डेबिट कार्ड किंवा एटीएममध्ये पीएफ फंक्शनॅलिटी जोडली जाईल, असे श्रम मंत्री डॉ. मांडविया यांनी सांगितले.



























































