
आवळा खाल्ल्यास शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते. रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते, त्वचा व केसांसाठी आवळा खाणे उत्तम आहे, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास आणि हृदयाच्या आरोग्यासाठी मदत करते. आवळे साठवण्यापूर्वी स्वच्छ धुऊन पूर्णपणे कोरडे करा.
आवळा साठवताना किंवा वापरताना त्यात पाणी लागणार नाही याची विशेष काळजी घ्या. आवळे वाळवून त्याची पावडर बनवून ठेवू शकता. आवळ्याचा मुरंबा किंवा लोणचे बनवून काचेच्या बरणीत साठवा. अशा प्रकारे साठवलेले आवळे वर्षभर चांगले टिकतात.































































