श्रीवर्धन, कुर्डूवाडी, धरणगाव, यावल, फुलंब्रीसह 9 नगर परिषदांमध्ये मशालीचे तेज

नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुतीला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी महाविकास आघाडीनेही जोरदार टक्कर दिली. श्रीवर्धन, कुर्डुवाडी, धरणगाव, यावल, फुलंब्रीसह 9 नगरपरिषदांमध्ये शिवसेनेच्या मशालीचे तेज दिसून आले. या नगरपरिषदांमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले. श्रीवर्धनमध्ये अतुल चोगले, सोलापूरच्या कुर्डुवाडीत जयश्री भिसे, जळगावच्या यावलमध्ये छाया पाटील तर धरणगावमध्ये लीलाबाई चौधरी, छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये राजेंद्र ठोंबरे, नांदेड किनवट – सुजाता एड्रलवार, बुलढाण्याच्या मेहेकरमध्ये किशोर गारोळे, यवतमाळच्या ढाणकीमध्ये अर्चना वासमवार आणि अमरावतीच्या नंद-खांदेश्वर नगरपरिषदेमध्ये किशोर पाटोळे हे नगराध्यक्षपदी निवडून आले.