
नागपूरमध्ये सर्वच प्रभागांत मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे आढळून आले. भाजप नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबातील चार ते पाच मते एका प्रभागात तर एक मत दुसऱ्याच प्रभागात टाकण्यात आले. यावरून गडकरी यांनी पालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. नागपूर शहरातील अनेक उमेदवार व माजी नगरसेवकांनाही मतदार यादीतील घोळाचा फटका बसला. यासंदर्भात बोलताना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, मतदार याद्या यापुढे व्यवस्थित केल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून कुणीही मतदानापासून वंचित राहणार नाही. निवडणूक आयोगाने याची योग्य ती दखल घ्यावी.































































