
हिंदुस्थानात कॅन्सरचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत. यामुळे देशात सध्या हे सर्वात मोठे संकट बनत चालले आहे. देशभरात दरवर्षी जवळपास 15 लाख नवीन रुग्ण आढळत आहेत, परंतु 2045 पर्यंत ही संख्या 15 लाखांऐवजी 24.5 लाख होण्याची भीती इंडियन कॅन्सर सोसायटीने व्यक्त केली आहे. ही भीती जर खरी ठरली तर देशातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येईल, असेही कॅन्सर सोसायटीने म्हटले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात कर्परोगाच्या उपचारांसाठी प्रमुख उपाययोजनांची घोषणा करण्यात आली आहे.





























































