मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी कायम, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना मनस्ताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्यापाशी प्रोपलेन गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने गेल्या 32 तासांपासून प्रवाशांचे अतोनात हाल झाले. टँकरमधून गॅसची गळती सुरू झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने दोन्ही बाजूंची वाहतूक रोखून धरली होती.तब्बल 32 तासांनंतर टँकर हलवण्यात यश आल्याने मध्यरात्री दोननंतर वाहतूक सुरू झाली. मात्र आता पुन्हा आज शुक्रवारी सकाळी वाहतूक कोंडी झाली असून यात शेकडो वाहने अडकली आहेत.जोपर्यंत त्या गाड्या हटवल्या जाणार नाही तोपर्यंत वाहतूक सुरळीत होणार नाही.

वीकेंडमुळे वाहनांची संख्या वाढली असून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर कोंडी झाली आहे. सलग चौथ्या दिवशी प्रवासांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. घाटातील चढणीवर काही अवजड वाहने बंद पडल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. यामुळे प्रवाशांना अद्यापही संथ गतीने प्रवास करावा लागत आहे. यामुळे प्रवासाचा वेळ दुप्पट झाला आहे. अमृतांजन पूल ते खालापूर टोल नाकादरम्यान 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.

पुणे एक्स्प्रेस वेची 32 तासांनंतर सुटका