
गोवंडीच्या कमला रामन नगरात आज गोळीबाराची घटना घडली. 19 वर्षीय तरुणीची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने शिवाजीनगर परिसरात मात्र घबराटीचे वातावरण पसरले आहे.
आज दुपारी बैंगनवाडी येथील फुरकान्या क्षेत्राअंतर्गत ही घटना घडली. आरोपीने सोबत आणलेल्या बंदुकीतून तरुणीवर गोळी झाडली. यात त्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. गोळी झाडल्यानंतर आरोपी परिसरातून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी तरुणीला शताब्दी इस्पितळात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेसह 23 वर्षीय पुरुषाला ताब्यात घेतले असून प्रेमसंबंधातील वादातून ही घटना घडल्याचा संशय आहे.


























































