
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ‘X’ वर एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. या व्हिडीओमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ‘ईव्हीएम मशीनमधून घोटाळे केले जाऊ शकतात त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही’ असे म्हणताना दिसत आहेत.
President Trump is saying loud & clear:
EVMs cannot be trusted — there’s fraud risk!
Paper ballots are reliable & trustworthy!
Dear Mr. Prime Minister & bhakt brigade: Listen to your ‘Maha Guru’ at least once!
And as usual, Godi media is dead silent. 🤐#EVMScam #PaperBallots” pic.twitter.com/OXTB1KFXVh— Sanjay Raut (@rautsanjay61) February 23, 2026
ट्रम्प यांचा व्हिडीओसोबत संजय राऊत यांनी एक पोस्ट देखील शेअर केली आहे. ”प्रेसिडेंट ट्रम्प काय सांगतोय? श्रीमान प्रधानमंत्री व त्यांच्या भक्त मंडळीनो ऐका : EVM वर भरवसा ठेवता येत नाही त्यात घोटाळा आहे; मत पत्रिकेवर चे मतदान विश्वासार्ह आहे! मिस्टर पंतप्रधान तुमच्या महा गुरुचे तरी ऐका! हो,आणि गोदी मीडिया यावर नेहमीप्रमाणे चूप”, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे.






























































