वादळ, वारा अन् पावसाच्या धामधूमीत महिला T20 World Cup चा धुरळा उडणार; हिंदुस्थान-पाकिस्तान कधी भिडणार? वाचा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ICC Women’s T20 World Cup 2026 चे संपूर्ण वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे. इंग्लंडच्या धर्तीवर रंगणाऱ्या या स्पर्धेत षटकार अन् चौकारांच्या आतषबाजीसह काही नवखे संघ सुद्धा आपलं नशीब आजमावणार आहेत. 15 जून ते 5 जुलैच्या दरम्यान महिला वर्ल्ड कपचा थरार चाहत्यांना अनुभवता येणार आहे. 12 संघ टी20 वर्ल्ड कप उंचावण्यासाठी एकमेकांना कडवी झुंज देतील.

इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या या टी20 वर्ल्डकपसाठी 12 संघांची दोन ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे. ग्रुप A मध्ये हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, बांगलादेश आणि पाकिस्तान या संघांचा समावेश आहे. तर ग्रुप B मध्ये वेस्ट इंडिज, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड आणि स्कॉटलंड या संघांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नेदरलँड पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकपमध्ये आपला श्री गणेशा करणार असून त्यांचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. तसेच सर्वांच्या ज्या सामन्याची प्रतिक्षा आहे, ती हिंदुस्थानविरुद्ध पाकिस्तान लढत 14 जून रोजी एजबॅस्टनमध्ये होणार आहे.

टी20 वर्ल्ड कपचे संपूर्ण वेळापत्रक

12 जून – इंग्लंड Vs श्रीलंका
13 जून – स्कॉटलंड Vs आयर्लंड, ऑस्ट्रेलिया Vs दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज Vs न्यूझीलंड
14 जून – हिंदुस्थान Vs पाकिस्तान, बांगलादेश Vs नेदर्लंड
16 जून – न्यूझीलंड Vs श्रीलंका, इंग्लंड Vs आयर्लंड
17 जून – हिंदुस्थान Vs नेदर्लंड, ऑस्ट्रेलिया Vs बांगलादेश, दक्षिण आफ्रिका Vs पाकिस्तान
18 जून – वेस्ट इंडिज Vs स्कॉटलंड
19 जून – न्यूझीलंड Vs आयर्लंड
20 जून – ऑस्ट्रेलिया Vs नेदर्लंड, पाकिस्तान Vs बांगलादेश, इंग्लंड Vs स्कॉटलंड
21 जून – हिंदुस्थान Vs दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज Vs श्रीलंका
23 जून – न्यूझीलंड Vs स्कॉटलंड, श्रीलंका Vs आयर्लंड, ऑस्ट्रेलिया Vs पाकिस्तान
24 जून – इंग्लंड Vs वेस्ट इंडिज
25 जून – हिंदुस्थान Vs बांगलादेश, दक्षिण आफ्रिका Vs नेदर्लंड
26 जून – श्रीलंका Vs स्कॉटलंड
27 जून – पाकिस्तान Vs नेदर्लंड, वेस्ट इंडिज Vs आयर्लंड, इंग्लंड Vs न्यूझीलंड
28 जून – हिंदुस्थान Vs ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका Vs बांगलादेश

30 जून – सेमीफायनल क्रमांक 1
2 जुलै – सेमीफायनल क्रमांक 2
5 जून – फायनल