T20 WC 2026 – ‘चोकर्स’चा शिक्का कायम! आफ्रिकेला 9 विकेट्सनी लोळवत न्यूझीलंड फायनलमध्ये, एलेनचा शतकी झंझावात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 मधील पहिल्या उपांत्य लढतीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव करत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या लढतीत दक्षिण आफिकेने विजयासाठी दिलेले 169 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 12.5 षटकात लिलया पार केले. सलामीवीर फिन एलेन याने शतकी तर टीम सैफर्ट याने अर्धशतकीय खेळी (58) करत संघाला फायनलचे तिकीट मिळवून दिले.

फिन एलेन याने अवघ्या 33 चेंडूत नाबाद 100 धावांची विक्रमी खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने 10 चौकार आणि 8 षटकारांचा पाऊस पाडला. त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आता गुरुवारी हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर दुसरा उपांत्य सामना रंगणार आहे. या लढतीतील विजेत्या संघाचा अंतिम फेरीत न्यूझीलंडशी सामना होईल. 8 मार्च रोजी हा विजेतेपदाचा सामना रंगेल.

T20 WC 2026 – वाटचाल नाही, अंतिम निकाल महत्वाचा; मॉर्न मॉर्कलने फुंकले विजयाचे रणशिंग