Dhurandhar 2 – चित्रपटातील मानधनातही रणवीर सिंह ठरला ‘धुरंधर’! जाणून तुम्ही देखील चकीत व्हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित धुरंधर 2: द रिव्हेंज हा चित्रपट रिलीजपूर्वीच चर्चेचा विषय ठरत आहे. यामागचं कारण म्हणजे चित्रपटातील स्टारकास्टच्या मानधनाची समोर आलेली माहिती. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंह याने तब्बल 50 कोटी मानधन घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, तो या चित्रपटातील दोन्ही भागांमध्ये असल्याने, त्याचे मानधन हे सर्वाधिक असल्याचे म्हटले जात आहे.

‘धुरंधर: द रिव्हेंज’ची प्रदर्शनापूर्वीच कोटींची उड्डाणे, ठराविक शहरांमध्ये मध्यरात्री 2 वाजता आणि पहाटेचेही शो

रणवीर सिंहच्या खालोखाल संजय दत्तने चित्रपटात काम करण्यासाठी 10 कोटी मानधन घेतले आहे. त्यानंतर या चित्रपटातील खलनायकाची भूमिका वठवणारा अर्जुन रामपाल याने फक्त १ कोटी मानधन घेतले. आर माधवन याचे मानधन हे संजय दत्तच्या खालोखाल असून, 9 कोटी इतके मानधन त्याला देण्यात आले आहे. या चित्रपटातील प्रमुख नायिका सारा अर्जुनला 1 कोटी मानधन देण्यात आले आहे.

विजय देवरकोंडासोबत काम करु नकोस! ‘डिअर कॉम्रेड’चित्रपटासाठी रश्मिकाच्या घरच्यांनी का विरोध केला, जाणून घ्या

धुरंधर 2: द रिव्हेंज हा मोठ्या बजेटचा अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपट असून, याचे दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले आहे. चित्रपट 19 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता देशभरातील मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये अतिरिक्त शोज वाढवले जात आहेत. काही ठिकाणी तर मध्यरात्री आणि पहाटेचे शोजही ठेवण्यात आले आहेत. अनेक शहरांमध्ये पहिल्या दिवशीचे शोज आधीच हाऊसफुल झाले आहेत.