श्रीनगर-लेह महामार्गावर हिमस्खलन; 7 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमधील श्रीनगर ते लेह महामार्गावर आज दुपारी झालेल्या हिमस्खलनात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. जोजिला पासजवळ झालेल्या हिमस्खलनात डझनभर गाडय़ा 6 फुटांपेक्षा जास्त बर्फात दबल्या. त्यामुळे अनेकांना गाडय़ांमधून बाहेर पडताच आले नाही.

प्राप्त माहितीनुसार जोजिला पासजवळच्या झीरो पॉइंटजवळ ही घटना घडली. अचानक हिमस्खलन झाले आणि प्रचंड बर्फ मार्गावरील गाडय़ांवर आला. ट्रक, कार तसेच काही एयूव्ही गाडय़ा त्यात पूर्णपणे दबल्या. पोलिसांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. मार्गावरून मलबा आणि बर्फ हटवल्यानंतर पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली.