
अमेरिकेतील फ्लोरिडा येथील पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलण्यात येणार आहे. या विमानतळाला आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देण्यात येणार आहे. गव्हर्नर रॉन डेसँटिस यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर 1 जुलैपासून नावात बदल केला जाईल. फ्लोरिडा सरकारच्या निर्णयानंतर, आता हे नाव लागू करण्यासाठी फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनला औपचारिक प्रस्ताव पाठवला जाईल. अमेरिकन खासदार ब्रायन मस्ट यांनी विमानतळाचा तीन अक्षरी कोड पीबीआयवरून डीजेटी असा बदलण्याचा प्रस्तावही ठेवला आहे.

























































