गडचिरोली ‘नक्षलमुक्त’, ऑपरेशन ‘अंतिम प्रहार’मध्ये शेवटचे 8 माओवादी जेरबंद; एकही माओवादी शिल्लक नसल्याचा सरकारचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गडचिरोली जिह्यात पोलिसांनी हाती घेतलेल्या ऑपरेशन ‘अंतिम प्रहार’मध्ये शेवटचे आठ जहाल माओवादी जेरबंद करण्यात आले. आता रेकॉर्डवरील एकही नक्षलवादी शिल्लक नसल्याने गडचिरोली जिल्हा ‘नक्षलमुक्त’ झाल्याचा दावा सरकारने केला आहे.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफने संयुक्तपणे ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ मोहीम राबवली होती. फेब्रुवारी महिन्यात गडचिरोलीतील पह्देवाडा जंगल परिसरात झालेल्या चकमकीत एका सी-60 जवानाची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. त्या नक्षलवाद्यांना शोधण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली होती.

या मोहिमेत राजू ऊर्फ मंगडू वेको, त्याची पत्नी जन्नी ऊर्फ नगी येमला, ज्योती ऊर्फ अकिला पोटावी, जयराम गावडे, मुकेश अवलाम, विजय तामो, रजिता मडावी आणि आमती पोडीयाम या आठ माओवाद्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 2 एलएमजी रायफल, 4 एके-47, 4 एसएलआर, 3 इन्सास रायफलसह एकूण 51 शस्त्रs, दारूगोळा आणि माओवादी साहित्य जप्त करण्यात आले. 65 लाख 34 हजार इतकी रोख रक्कमही त्यांच्याजवळ सापडली.