
फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पेने पॅराग्वेच्या सिनेटर सेलेस्टे अमरीला यांच्या वंशद्वेषी वक्तव्यांवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या वादानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही एम्बाप्पेला पाठिंबा दर्शवला आणि वंशद्वेषाविरोधात कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले. फ्रान्सने पॅराग्वेला पराभूत केल्यानंतर या महिलेने वादग्रस्त वक्तव्य केले होते.
अमरीला यांची वादग्रस्त टिप्पणी
पॅराग्वेच्या सिनेटर सेलेस्टे अमरीला यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियावर एम्बाप्पेबद्दल वंशद्वेषी टिप्पणी केली. त्यांनी एम्बाप्पेबद्दल लिहिले की, ‘कॅमेरूनमध्ये जन्म होऊनही तो फ्रान्सचा नागरिक असल्याचे भासवत आहे. इतकेच नाही तर त्यांनी एम्बाप्पेला ‘रानटी’ म्हटले. त्याचबरोबर एम्बाप्पे हा अशिक्षित असून त्याला त्याला लिहिताही येत नाही असेही लिहिले आहे.
एम्बाप्पेने दिले चोख उत्तर
एम्बाप्पेने अमरीला यांना प्रत्युत्तर देण्यासाठी या शब्दाचाही वापर केला. त्यांचा फोटो शेअर करत त्याने लिहिले, ‘सेलेस्टे अमरीला, तू एक अत्यंत नीच स्त्राr आहेस आणि तुझ्या पदासाठी पूर्णपणे अपात्र आहेस. तू पॅराग्वेचे प्रतिनिधित्व करत नाहीस. हा तो देश आहे जो संपूर्ण स्पर्धेत उत्कटतेने, कठोर परिश्रमाने आणि प्रतिष्ठsने खेळला. तुमच्या बेजबाबदार कृती आणि उघड वर्णद्वेषी विधानांमुळे जग आता पॅराग्वेच्या खेळाडूंच्या शानदार कामगिरीला विसरले आहेत. चाहते आता विश्वचषकातील त्यांच्या ऐतिहासिक वाटचालीला नव्हे, तर आपल्या देशाच्या प्रतिमेला सर्वाधिक नुकसान पोहोचवणाऱया एका अपात्र महिलेला लक्षात ठेवत आहे.’






























































