आठ वर्षांच्या संसारानंतर प्रिन्स नरुला युविका चौधरी यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीव्ही विश्वातील लोकप्रिय जोडी प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी पुन्हा एकदा त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्याची चर्चा रंगल्याने त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या अफवा पसरल्या आहेत. यामुळे लग्नाच्या आठ वर्षांनंतर हे जोडपे वेगळे होणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. प्रिन्स आणि युविका यांची प्रेमकहाणी Bigg Boss 9 या रिअॅलिटी शोमधून सुरू झाली होती. शोदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 2018 मध्ये त्यांनी विवाह केला. त्यानंतर ही जोडी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल्सपैकी एक म्हणून ओळखली जाऊ लागली.

 

या दाम्पत्याला 2024 मध्ये कन्यारत्न प्राप्त झाले. मुलीच्या जन्मावेळीही त्यांच्या नात्याबाबत विविध अफवा समोर आल्या होत्या. मात्र त्यावेळी त्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे दिसून आले होते. असे वृत्त आज तक ने दिले आहे. प्रिन्स आणि युविकाने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफाॅलो केले आहे. त्यामुळेच आता पुन्हा सोशल मीडियावरील हालचालींमुळे घटस्फोटाच्या चर्चांना वेग आला आहे. प्रिन्स नरुला किंवा युविका चौधरी यांनी अद्याप या चर्चांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सध्या या सर्व चर्चा केवळ अफवांपुरत्याच मर्यादित असून, त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.