
तालुक्यातील चौकुळ गावातील महार्टवाडी-बेरडकी येथे शनिवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास निसर्गाने अक्षरशः थैमान घातले. प्रचंड वेगाने सुटलेल्या वादळी वाऱयासह मुसळधार पावसाने घरांवरील सिमेंटची पत्रे हवेत उडाले, काwलारू घरे उद्ध्वस्त झाली, तर एका वृद्धाचे घर पूर्णपणे कोसळले. यात 24 कुटुंबांचे आयुष्यभराचे कष्ट उद्ध्वस्त झाले.





























































