
छत्तीसगडच्या प्रख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या डॉ. तीजन बाई यांचे रायपूर येथील एम्स रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 72 वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्या गंभीर आजारांशी झुंज देत होत्या. दरम्यान रविवारी पहाटे 3 वाजून 15 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने कला जगतावर शोककळा पसरली आहे.
अलीकडेच फुफ्फुसात पाणी साचणे, न्यूमोनिया आणि कमी रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना 27 मे रोजी एम्स रायपूरच्या क्रिटिकल केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले होते, जिथे उपचारादरम्यान त्यांचा रविवारी पहाटे 3 वाजून 15 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छत्तीसगडची प्रसिद्ध लोककला ‘पंडवानी’ (महाभारतातील कथांचे गायन) आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणाऱ्या, दिग्गज लोकगायिका आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या डॉ. तीजन बाई यांचं दीर्घ आजारानं निधन झालं.




























































