
मोहम्मद सालाहच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये इजिप्तने इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाला पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 अशी धूळ चारत इजिप्तने प्रथमच विश्वचषकाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 120 मिनिटांनंतर सामना 1-1 असा बरोबरीत सुटल्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये होसाम अद्बेलमागुइदने निर्णायक किक यशस्वी ठरवत इजिप्तच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. आता पुढील फेरीत त्यांची गाठ लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाशी होणार आहे.






























































