
जिह्याच्या घाटमाथ्यावर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे डोंगराळ भागात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. सिंहगड किल्ल्याच्या पायरी मार्गावर दरड कोसळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सिंहगड पर्यटकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. तर अन्य घाटमार्गांवरही दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.




























































