ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी हे 8 ते 10 जुलै या कालावधीत ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाणार आहेत. त्यावेळी 9 जुलै रोजी ‘मेलबर्न मिट्स मोदी’ हा कार्यक्रम मेलबर्न येथील मार्वल स्टेडियममध्ये होणार आहे. या स्टेडियमचे छत कार्यक्रमादरम्यान बंद ठेवा, अन्यथा ते ऑस्ट्रेलियात स्वतःच्या मृत्यूसाठी येतील, अशी धमकी अबू मुस्तफा नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून देण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या प्रचारासदंर्भातील फेसबुक पोस्टवर ही कमेंट करण्यात आली आहे. याबाबत ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांनी तपास सुरू केला आहे. धमकीसंदर्भातील आयपी अॅड्रेस शोधण्यात आला आहे, मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.