महालक्ष्मी येथील क्लस्टरमध्ये सफाई कामगारांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन शिवसेनेच्या मागणीला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे महालक्ष्मी आर्थर रोडच्या समूह पुनर्विकास योजनेतील सफाई कामगारांना दिलासा मिळाला आहे. महानगरपालिकेच्या सेवा निवासस्थानाच्या आवारात राहणाऱ्या या झोपडीधारकांची एका महिन्यात पात्रता तपासून पात्र झोपडीधारकांचे आहे त्याच परिसरात पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.

आर्थर रोड येथे सुरू असलेल्या समूह पुनर्विकास योजनेत विकासकाने पालिकेच्या सफाई कामगारांच्या पात्र झोपड्यांचा या योजनेत समावेश केला नाही. याबाबत शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावर राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, संबंधित १५ झोपडीधारक किती वर्षांपासून तेथे वास्तव्यास आहेत याची पडताळणी सुरू आहे.

आवश्यक कागदपत्रांच्या आधारे महिनाभरात त्यांची पात्रता निश्चित करून पात्र झोपडीधारकांचे आहे त्याच परिसरात पुनर्वसन करण्यात येईल.