
अहमदाबाद येथे वर्ष 2008मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी इंडियन मुजाहिदीनच्या 38 दहशतवाद्यांची फाशी आणि 11 दहशतवाद्यांची जन्मठेप गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवली.
अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी सत्र न्यायालयाने फेब्रुवारी 2022मध्ये इंडियन मुजाहिदीच्या 38 दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्याविरोधात दोषींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.


























































