
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात सोमवारी रात्री पोलीस चौकीवर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 9 पोलिसांचा मृत्यू झाला असून, पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेनंतर, सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण प्रदेशात मोठी शोधमोहीम सुरू केली.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, बलुचिस्तानच्या झियारत जिल्ह्यातील मांगी डॅम परिसरातील एका पोलीस चौकीवर झाल्याचे पोलिासांनी सांगितले. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत संपूर्ण परिसर सील केला. झियारतचे उपायुक्त अब्दुल कुदूस अचकझाई यांनी 9 पोलिसांच्या मृत्यूची पुष्टी केली.
पाच पोलीस अधिकारी अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यासाठी मोहिम सुरू असल्याचे अब्दुल कुदूस अचकझाई यांनी सांगितले. परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.




























































