वाढदिवसाच्या पार्टीहून परतताना काळाचा घाला, एसयूव्हीची ट्रकला धडक; 5 जण ठार, एक गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
odisha accident

वाढदिवसाच्या पार्टीहून परतत असताना भरधाव एसयूव्ही ट्रकला धडकल्याने अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. अपघाताची माहिती मिळताच ‘डायल-112’ ची पथके, महामार्ग गस्त पथक आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील मैहर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग 30 वर मंगळवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या एका एसयूव्हीने ट्रकला मागून धडक दिली. या अपघातात एसयूव्हीतील पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ठार झाले आणि एक जण गंभीर जखमी झाला. धडक इतकी जोरदार होती की एसयूव्हीचा चक्काचूर झाला आणि त्यातील सर्व प्रवासी आतच अडकून पडले.

गंभीर जखमीला अमरपाटन येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला सतना येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अंकुर पटेल (40), मृदुल पटेल (32), विजय पटेल (30), हरिशंकर पटेल (25) आणि शिवा पटेल (23) अशी मृतांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी मैहर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र नंतर पूर्ववत करण्यात आली.