पावसाने वाट लावली! वसईच्या रेल्वे मार्गाचा समुद्र झाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, नाशिक, सातारा, पालघर, वसई-विरारमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या धुवांधार पावसाने तिसऱया दिवशीही राज्यभरात राडा सुरूच ठेवला. सोमवारी राज्यातील अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी वाट लावली. वसईत अति मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. संपूर्ण रेल्वे रुळ पाण्यात गेले. पुण्यातील आळंदीत पावसाने कहरच केल्याचे दिसले. इंद्रायणी नदीला पूर आल्याने आजूबाजूच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. कोकणातही पावसाने जबरदस्त बॅटिंग केली. नाशिक, इगतपुरी, रत्नागिरी आणि कोल्हापुरला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पाऊस गेल्या तीन दिवसांपासून जणूकाही ‘24 तास ऑन डय़ुटी’ करत असल्याचे दिसले.