
मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीच्या कोंडीमुळे नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईहून नागपूरला येणाऱया आणि जाणाऱ्या अनेक विमानांना विलंब झाला. या कोंडीचा फटका नागपूरच्या लोकप्रतिनिधींनाही बसला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विकास ठाकरे, समीर मेघे, प्रवीण दटके आणि डॉ. राजीव पोतदार यांनी सोमवारची मुंबईवारी रद्द केली.




























































