
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, विदर्भात पावसाने धूमशान घातले असले तरी मराठवाडय़ावर मात्र वाझोंटय़ा ढगांचीच गर्दी झाली आहे. डिझेल टंचाईमुळे खरिपाची मशागत ठप्प झाली होती. कशीबशी मशागत उरकून शेतकऱयांनी आभाळाकडे डोळे लावले. सगळा मृग कोरडा गेला. आर्द्रा लागताच पावसाने मेहेरबानी केली. दोन दिवस बरसून पाऊस जो गायब झाला तो अद्याप परतलेला नाही. मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे खरिपाच्या पेरण्यांनाही उशीर झाला. दोन दिवसांपासून मराठवाडय़ात पावसाळी वातावरण असले तरी रिमझिम पावसाने मराठवाडय़ाची तहान भागणार नाही.




























































