पोटच्या चिमुकल्याला आईने दिले गरम उलथण्याचे चटके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘माता न तू वैरिणी’ याचा प्रत्यय ठाण्यातील वागळे इस्टेटमधील किसनगरमध्ये आला आहे. साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यावर त्याच्याच आईने अमानुष कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोटच्या चिमुकल्याला आईने चक्क गरम उलथण्याचे चटके दिले असल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

पीडित मुलगा आपल्या आजीसोबत जवळच असलेल्या एका कार्यालयात आला. मुलाच्या अंगावरील झालेल्या जखमा पाह्यानंतर उपस्थितांना एकच धक्का बसला. पीडित मुलाने आपल्यासोबत झालेला प्रकार सांगितल्यानंतर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली. तातडीने त्याला जवळील रुग्णालयात दाखल करून मुलावर उपचार सुरू करण्यात आले. संतप्त नागरिकांनी त्या महिलेला वागळे इस्टेट पोलिसांच्या ताब्यात दिले असून तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.