
सिंधुदुर्ग जिह्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱयाने थैमान घातले आहे. जिह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. बांदा जवळील इन्सुली परबवाडी येथे रात्री येथील हरी गजानन धुरी यांच्या राहत्या घरावर माडाचे मोठे झाड कोसळल्याने घराचे नुकसान झाले. तर कुडाळ तालुक्यातील चेंदवण-टेंबवाडी परिसरालाही वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. येथील विजय मेस्त्राr, गिरीजा मेस्त्राr आणि गणपत मेस्त्री यांच्या घरांवर मोठे झाड कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कोकण रेल्वे तीन तास उशिराने!
सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. रेल्वे मार्गावर पाण्याचा निचरा योग्य गतीने होत नसल्याने अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस गाडय़ा तब्बल तीन ते साडेतीन तास उशिराने धावत होत्या.




























































