Ratnagiri News – खेड दहिवलीत भूस्खलन होऊन घर कोसळले; दोघे ढिगाऱ्याखाली अडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड तालुक्यातील दहिवली शेलारवाडा येथे भूस्खलन होऊन घर कोसळले आहे. कोसळलेल्या घराच्या ढिगाऱ्याखाली दोघेजण अडकले आहेत. एका महिलेला वाचवण्यात यश आले आहे.

दहिवली शेलारवाडी येथे अतिवृष्टी मध्ये काल रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास घर कोसळले. या घरामध्ये एकूण तिघेजण अडकले होते. त्यापैकी कल्पना शेलार (वय 75) यांना सुखरूप ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. तर शांताराम बाळा शेलार (वय ८५) आणि सतीश शेलार (वय 35) हे घराखाली अडकून पडले आहेत.