
तुमचे पोस्टात खाते असेल आणि तीन वर्षे कोणताही व्यवहार केलेला नसेल तर ते गोठवले जाऊ शकते. ते सुरू ठेवण्यासाठी एखादा व्यवहार करणे आवश्यक आहे.
तुमचे मूळ पासबुक, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि केवायसी अपडेट फॉर्म आदी कागदपत्रे गोळा करा. जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये ‘खाते सुरू करण्याचा’ अर्ज भरा.
जर खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे असेल, तर तुम्ही जवळच्या आयपीपीबी आऊटलेटवर जाऊन बायोमेट्रिक पडताळणी करून खाते पुन्हा चालू करू शकता.
अधिक माहितीसाठी त्यांच्या 155299 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा. खाते पुन्हा सुरू करण्यासाठी पोस्टाकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.
केवायसी पूर्ण करण्यासाठी पोस्ट ऑफिस कर्मचारी तुमची अंगठय़ाची/बोटाची ओळख पडताळणी करतील. ते यशस्वी झाल्यावर खाते लगेच सक्रिय केले जाते.





























































