वायनाडमध्ये भूस्खलन, दोघांचा मृत्यू; मातीच्या ढिगाऱ्याने टँकरला फरफटत नेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळमच्या वायनाडमध्ये मंगळवारी मुसळधार पावसामुळे भूस्खलनाची घटना घडली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना मीनाक्षी पुलाजवळ घडली. या ठिकाणी मलप्पुरम-वायनाड टनल प्रोजेक्टच्या पंस्ट्रक्शनचे काम सुरू होते.

या बोगद्यातून निघालेली माती बाहेर जमा झाली होती. मुसळधार पाऊस पडल्याने ही माती रस्त्यावर अचानक येऊन पडली. यामुळे झाडे उन्मळून पडली. रस्त्यावरील वाहने बाजूला फेकली गेली. या दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यात स्पष्ट दिसते की, मातीच्या ढिगाऱ्याने टँकरला रस्त्यावरून फरफटत नेले. यात दोन जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले गेले. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, एनडीआरएफच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली.

मलप्पुरम-वायनाड टनल प्रोजेक्ट अंतर्गत मलप्पुरमला वायनाडशी बोगद्याने जोडले जाणार आहे. या बोगद्याची लांबी जवळपास 8.17 किमी लांब असून यासाठी 2200 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.