
मुंबईत अनधिकृत बाईक टॅक्सीवाल्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांच्यामुळे वाहतुकीला त्रास होतोय, प्रदूषण वाढतेय आणि शासनाचा महसूलही बुडतोय. त्याला पायबंद घालण्यासाठी १ ऑगस्टपासून बाईक टॅक्सी तसेच ओला, उबेर चालकांना डोमिसाईलची सक्ती करण्यात येणार असून परवानगी हवी आहे त्यांना बॅज देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत स्पष्ट केले.
आमदार दिलीप लांडे यांनी अनधिकृत प्रवासी वाहतुकीमुळे टॅक्सी आणि रिक्षाचालकांच्या अधिकृत व्यवसायावर गंभीर परिणाम होत असल्यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. बाईक टॅक्सीचालकांची कुठलीही पोलीस पडताळणी केली.
साडेचार लाख बेकायदा बाईक टॅक्सी
आजच्या तारखेला साडेचार लाख बेकायदा बाईक टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावर आहेत आणि त्यातून शासनाला एक रुपयाही महसूल मिळत नाही, अधिकारी कारवाई करून दंड आकारतात, पण मोठ्या कंपन्या चालकांना दंड भरायला सांगून त्याचे पैसे त्यांना देतात. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात बैठक घेतली होती. महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना रोजगार निर्माण व्हावा यासाठी निर्णय घेतोय असे त्यांनी सांगितले असल्याचे सरनाईक म्हणाले.
जात नाही. त्यांच्याकडे शासनाचा परवाना आणि विमाही नाही. यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लांडे यांनी केली. परिवहनमंत्री सरनाईक यांनी मुंबई महानगर क्षेत्रात असे घडत असल्याची कबुली देतानाच सांगितले की, बाईक टॅक्सी चालावी व सर्वसामान्यांची सोय व्हावी यासाठी परिवहन विभागाने प्रस्ताव तयार केला होता. बाईक टॅक्सींना परवानगी दिल्यास मोठ्या प्रमाणात पेट्रोलच्या गाड्या रस्त्यावर येऊन प्रदूषण वाढेल आणि त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होईल, असे मत मुख्यमंत्र्यांनी मांडले असल्याचे सरनाईक म्हणाले.
बेधुंद गाड्या चालवणाऱ्या ओला, उबेर चालकांना आवरा – सुनील प्रभू
ओला आणि उबेर चालक रात्रीच्या वेळी नशा करून रस्त्यांवर बेधुंदपणे गाड्या चालवतात, या चालकांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. झोमॅटो व स्विगीच्या पार्सल बाईकचाही सुळसुळाट झाल्याने वाहतुकीचा बोजवारा उडतो. याकडे लक्ष वेधत शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी बेधुंद गाड्या चालवणाऱ्यांना आवरा अशी मागणी केली.
मुंबईतून मुले, मुली हरवताहेत त्यामागचे हेच सूत्रधार – अजय चौधरी
ओला, उबेर चालकांमध्ये कश्मिरी आणि बंगाली चालक मोठ्या प्रमाणात आहेत. गाड्या बुक करताना त्या चालकांना मराठी तर सोडा, साधे हिंदी बोलता येत नाही. त्यांचे आधार कार्ड, लायसन्स बारकाईने तपासणे आवश्यक आहे. मुंबईतील मुले, मुली हरवताहेत त्यामागचे हेच सूत्रधार असावेत, अशी शंका शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी व्यक्त केली. या चालकांची संपूर्ण कागदपत्रे व लायसन्स चेक करण्यासाठी विशेष मोहीम राबवा, अशी मागणी केली.






























































