
राम मंदिरातील देणगी चोरीच्या निषेधार्थ बुधवारी सायंकाळी 7 वाजता शिवसेना शीव-कोळीवाडा विधानसभेच्या वतीने रामरक्षा व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यालंकार मार्गावरील वाल्मीकी चौकातील श्री हनुमान मंदिरात हे आंदोलन होईल. यावेळी शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, विभागप्रमुख प्रमोद शिंदे, महिला विभाग संघटक पद्मावती शिंदे उपस्थित राहणार आहेत. तमाम हिंदूंनी या महाआरतीत सहभागी व्हावे, असे आवाहन विधानसभाप्रमुख गोपाळ शेलार यांनी केले आहे.



























































