
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना आमदार अॅड. अनिल परब यांनी एनएससीआय क्लबबाबत सवाल उपस्थित केला. एनएससीआय क्लबमध्ये खेळ सोडून बाकी सगळं चालतं. कॅगच्या अहवालानंतर लोकलेखा समितीने निर्णय दिला आहे की, जोपर्यंत या क्लबमधील नियमांचे सर्व उल्लंघन मिटत नाही, तोपर्यंत खेळाची ॲक्टिव्हिटी सोडून बाकी सगळं बंद करा. याविषयी सविस्तर अहवाल येत नाही तोपर्यंत तिथे खेळ सोडून इतर ॲक्टिव्हिटीज आपण बंद करणार का? असा सवाल त्यांनी केला आहे
सध्या एनएससीआय क्लबमध्ये खेळ सोडून बाकी सगळं चालतं. राजकीय कार्यक्रम, विवाह सोहळे आणि इतर कार्यक्रम तेथे घेण्यात येतात. सरकारने ती जागा खेळासाठी दिली आहे. मात्र, खेळ सोडून तिथे इतर सर्व सुरू आहे. ज्यासाठी ती जागा दिली आहे. तेच तिथे होत नाही. ते तर आता ड्रग्ज सेंटर झालंय. तिथे झालेल्या कॉन्सर्टमध्ये ओव्हरडोस घेऊन लोक मृत्युमुखी पडले आहेत, असे अनिल परब म्हणाले.
कॅगच्या अहवालानंतर लोकलेखा समितीने निर्णय दिला आहे की, जोपर्यंत या क्लबमधील नियमांचे सर्व उल्लंघन मिटत नाही, तोपर्यंत खेळाची ॲक्टिव्हिटी सोडून बाकी सगळं बंद करा. याविषयी सविस्तर अहवाल येत नाही, तोपर्यंत तिथे खेळ सोडून इतर ॲक्टिव्हिटीज आपण बंद करणार का? असा सवाल त्यांनी केला. जर लोकलेखा समितीच्या सूचना पाळायच्या नसतील तर त्या समितीचा काय उपयोग आहे. त्यामुळे खेळ सोडून इतर ॲक्टिव्हिटीज आपण बंद करणार का? असा सवाल त्यांनी केला.





























































