
डोंबिवलीतील एका रुग्णालयात रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये वाद झाला. त्यानंतर नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयात जात महिला डॉक्टर, आणखी एक डॉक्टर तसेच तीन महिला परिचारिकांना मारहाण केली. या घटनेनंतर शिवसेना नेते, युवासोनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी डोंबिवली येथील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर्स आणि नर्सेसना झालेल्या अमानुष मारहाणीच्या पार्श्वभूमीवर आज स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत रुग्णालयाला भेट दिली. तसेच आम्ही तुमच्यासोबत आहोत, ही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही दिला.
याबाबत एक्सवर पोस्ट करत आदित्य ठाकरे यांनी या भेटीबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, डोंबिवली येथील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर्स आणि नर्सेसना झालेल्या अमानुष मारहाणीच्या पार्श्वभूमीवर आज स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत रुग्णालयाला भेट दिली. ह्यावेळी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास देतानाच ही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असेही सांगितले. माझ्या भेटीनंतर लगेच रमेश म्हात्रेला अटक करण्यात आली. मात्र केवळ अटक करून चालणार नाही तर त्याची धिंड काढली पाहिजे… त्याला नगरसेवक पदावरून हटवले पाहिजे, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
डोंबिवली येथील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर्स आणि नर्सेसना झालेल्या अमानुष मारहाणीच्या पार्श्वभूमीवर आज स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत रुग्णालयाला भेट दिली.
ह्यावेळी आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास देतानाच ही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही,… pic.twitter.com/DoXW0Xwc7T
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 8, 2026
काय आहे प्रकरण?
डोंबिवली पश्चिम येथील एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर नवजात बाळाला जन्मानंतर एनआयसीयू उपचारांची आवश्यकता लागू शकते, अशी माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. मात्र रुग्णाल यातील एनआयसीयूचे सर्व दहा बेड भरले असल्याने संबंधित महिलेला पुढील उपचारांसाठी अन्य रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. याच कारणावरून नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये वाद झाला. त्यानंतर नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयात येऊन महिला डॉक्टर, आणखी एक डॉक्टर तसेच तीन महिला परिचारिकांना मारहाण केली. व्हायरल व्हिडीओमध्ये म्हात्रे मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत. दरम्यान आंदोलनाच्या दणक्यानंतर रमेश म्हात्रे यांच्यासह पाचजणांवर विष्णूनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे.




























































