श्वानांचे दयामरण, एनजीओने केली याचिका दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच पिसाळलेल्या, अतिशय आजारी किंवा धोकादायक असलेल्या कुत्र्यांना दयामरण देण्याची परवानगी दिली आहे. या नव्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर ‘ऑनिमल्स आर पीपल टू’ या स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विशिष्ट परिस्थितीत कुत्र्यांना इच्छामरण देण्यास परवानगी देणाऱ्या न्यायालयाच्या आदेशाचा अर्थ भटक्या कुत्र्यांची अंदाधुंद कत्तल करणे असा लावला जाऊ शकत नाही, असे म्हणणे मांडत स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्टीकरण मिळवण्यासाठी विनंती केली आहे.