
राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने स्वपक्षातील नेत्यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांनी भाजपने मला आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपदाचा शब्द दिलाय असा गौप्यस्पोट केला आहे.
राज्यसभा आणि मंत्रीपदाच्या चर्चांबाबत बोलताना समीर भुजबळ म्हणाले, माझ्या मंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री आणि महायुतीच्या नेत्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली होती. मात्र त्यावेळी मंत्रीपदाच्या शपथेसाठी वेळ अतिशय कमी उपलब्ध होता. त्यामुळे तो शपथविधी पार पडू शकला नाही, परंतु ज्यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा फेरबदल होईल त्यावेळी मला नक्कीच संधी दिली जाईल, असा शब्द भाजपच्या पेंद्रीय नेतृत्वाकडून आणि महायुतीकडून देण्यात आला असल्याचे समीर भुजबळ यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
































































