
राज्य सरकारने आज चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. योगेश म्हसे-पाटील यांच्या सेवानिवृत्तीने रिक्त झालेल्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवपदी डॉ. माधवी खोडे-चावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सुनील महिंद्रकर यांची अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक म्हणून नेमणूक झाली आहे.
अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने यांची बदली जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी झाली आहे.
































































