शिवसेनेचे मुंबई विमानतळावरील कामगारांसाठी आज मार्गदर्शन शिबीर, केंद्रीय कामगार कायद्यांमुळे निर्माण संभ्रम दूर होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय कामगार कायद्यातील गुंतागुंत आणि नवनवीन कामगार संघटनांनी थाटलेली दुकाने यामुळे कामगारवर्ग संभ्रमात पडला असून प्रचंड मानसिक तणावाखाली आहे. त्यांना मार्गदर्शन करून तणावमुक्त करण्यासाठी शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या वतीने 15 जून रोजी दुपारी 1 वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय कामगार सेनेचे सदस्य असलेल्या सर्व कामगारांसाठी हे मार्गदर्शन शिबीर ठेवण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एमएलसीपी 08, टर्मिनल 2 इथे हे शिबिर होणार आहे. या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना नेते-खासदार संजय राऊत तसेच शिवसेना नेते खासदार व भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, शिवसेना नेते विभागप्रमुख-आमदार अनिल परब, सचिव-आमदार वरुण सरदेसाई, उपनेते-आमदार सचिन अहिर व मनोज जामसुतकर, भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवी व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कामगारांनी मोठय़ा संख्येने या शिबिराला उपस्थित रहावे, असे आवाहन शिबिराचे आयोजक व भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांनी केले आहे.