
अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळ्यावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आणखी एक खळबळजनक विधान केले आहे. ‘राम मंदिरात पहिल्या दिवसापासूनच हा खेळ सुरू होता आणि म्हणूनच मी आजतागायत रामजन्मभूमीच्या दर्शनासाठी गेलो नाही’, असा आरोप त्यांनी केला आहे. जनसत्ताने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
नेमके काय म्हणाले ब्रिजभूषण सिंह?
आयएएनएस वृत्तसंस्थेशी बोलताना ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राम मंदिर देणगी वादावर आपली स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “मला जे बोलायचे आहे, ते मी आधीच बोललो आहे. जेव्हा यावर कोणीही काही बोलत नव्हते, तेव्हा चार वर्षांपूर्वीच मी यावर भाष्य केले होते. म्हणूनच मी आजपर्यंत श्रीराम जन्मभूमीचे दर्शन घ्यायला गेलो नाही. कारण तिथे पहिल्या दिवसापासूनच हा खेळ सुरू होता.”
यापूर्वीही ब्रिजभूषण सिंह यांनी या प्रकरणाबाबत मोठा दावा केला होता. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले होते की, “जर मी सत्य बोललो, तर अनेकांना खूप मोठा धक्का बसेल आणि मी स्वतः वादात अडकेन. कारण ते लोक खूप ताकदवान आहेत. त्यामुळे केवळ भीतीपोटी मी सत्य बोलत नाहीये.”
अयोध्या, उत्तर प्रदेश: रेसलिंग फेडरेशन ऑफ़ इंडिया (WFI) के पूर्व प्रमुख बृजभूषण शरण सिंह ने राम मंदिर चंदे के विवाद पर कहा, “मुझे जो बोलना है, मैं पहले बोल चुका हूं और जब कोई नहीं बोला था संसार में, चार साल पहले बोल चुका हूं। इसलिए आज तक मैं राम जन्मभूमि दर्शन करने नहीं गया,… pic.twitter.com/m4tDHERRvk
— IANS Hindi (@IANSKhabar) July 4, 2026


























































