
>> नीलिमा प्रधान
मेष – कमकुवत होऊ नका
सूर्य राश्यांतर, चंद्र, शुक्र लाभयोग. अपमानास्पद वागणुकीचा त्रास होईल. क्षुल्लक कारणाने कमकुवत होऊ नका. नोकरीत तडजोड स्वीकारावी लागेल. सहकारी मदत करतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गैरसमज होतील. कायदा पाळा. शुभ दि. 17, 18
वृषभ – चौफेर यश प्राप्त होईल
सूर्य राश्यांतर, चंद्र शुक्र युती. प्रत्येक दिवस प्रगतीकारक. योग्य नियोजन करा. चौफेर यश प्राप्त होईल. कठीण कामे करा. नोकरीत बढती होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उन्नतीचे नवे दालन खुले होईल. स्पर्धेत अग्रेसर राहाल. शुभ दि. 15, 16
मिथुन – कठीण कामे मार्गी लावा
सूर्य राश्यांतर, रवि, बुध युती. संयम ठेवा. कठीण कामे मार्गी लावा. तुमच्या क्षेत्रात नवे काम करून दाखवाल. आत्मविश्वास वाढेल. नोकरीत योग्य बदल करता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार लाभतील. नावलौकिक मिळेल. शुभ दि. 15, 16
कर्क – कडवट भाष्य टाळा
सूर्य राश्यांतर, चंद्र, गुरू युती. सहनशीलता ठेवा. कार्याला वेग प्राप्त होईल. कडवट भाष्य टाळा. थट्टा मस्करी करताना सावध रहा. नोकरीच्या कामात लक्ष द्या. वरिष्ठांना खुष करता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व लाभेल. शुभ दि. 17, 18
सिंह – उतावळेपणा नको
बुध वक्री, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. उतावळेपणा नको. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरीत कामात सतर्क रहा. धंद्यात तत्पर रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा अंदाज चुकण्याची शक्यता. शुभ दि.17, 18
कन्या – तणाव वाढवू नका
सूर्य राश्यांतर, सूर्य, चंद्र लाभयोग. सप्ताहाच्या सुरूवातीपासून कामे करा. तणाव वाढवू नका. नोकरीत कोणालाही कमी लेखू नका. फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. प्रतिष्ठा वाढेल. मोह नको. शुभ दि. 15, 16
तूळ – कामाची प्रशंसा होईल
सूर्य राश्यांतर, रवि, बुध युती. संतापजनक घटनांना संयमाने सामोरे जा. तुमचे महत्त्व वाढेल. सावध रहा. नोकरीधंद्यात वाढ होईल. कामाची प्रशंसा होईल. नोकरीची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील योग्य मुद्दे मांडता येतील. शुभ दि. 15, 16
वृश्चिक – कामांना गती प्राप्त होईल
सूर्य राश्यांतर, चंद्र, गुरू युती. कठोर भाष्य टाळा. रेंगाळलेल्या कामांना गती प्राप्त होईल. प्रेरणादायक परिचय होईल. नोकरी-धंद्यात नवे करण्याची इच्छा बळावेल. कायद्याला धरून कामे करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कौतुक होईल. शुभ दि. 15, 16
धनु – वेग नियंत्रणात ठेवा
सूर्य राश्यांतर, चंद्र, शुक्र युती. चातुर्य आणि मधुर वाणी याचा वापर करून यश मिळवा. नोकरीत दगदग होईल. संयम ठेवा. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. दुखापत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. तुम्हाला शह दिला जाईल. शुभ दि. 17, 18
मकर – सौम्य धोरण ठेवा
सूर्य राश्यांतर, चंद्र, गुरू युती. सहकारी, मित्र यांच्या समवेत तणाव, वाद होतील. सौम्य धोरण ठेवा. नोकरीत वरिष्ठांचा दबाव राहील. पोटाची काळजी घ्या. फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ आश्वासन देतील. शुभ दि. 15, 16
कुंभ – अहंकार दूर ठेवा
सूर्य राश्यांतर, चंद्र शुक्र युती. अहंकाराचे वागणे त्रासदायक ठरेल. आरोप होतील. राग वाढवणाऱया घटना घडतील. कायदा पाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. विरोधकांना कमी लेखू नका शुभ दि. 17, 18
मीन- प्रगतीची संधी शोधा
सूर्य राश्यांतर, चंद्र, गुरू युती. संमिश्र स्वरूपाच्या घटना घडतील. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी शोधावी लागेल. कठोर शब्द नको. पोटाची काळजी घ्या. नोकरीत प्रभाव राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अभ्यासपूर्वक बोला. सतर्क रहा. शुभ दि. 15, 16




























































