
साथीच्या रोगांचा सर्वाधिक प्रसार होण्याचा धोका असणाऱ्या पावसाळ्यात कचरा ठेकेदारांचा वसईकरांच्य जीवाशी खेळ सुरू आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या अंतर्गत होणारी कचरा वाहतूक ही बंद गाड्यांमधूनच्च व्हावी असा नियम आहे. कचरा झाकण्यासाठी ताडपत्रीचे पैसेही पालिका ठेकेदारांना देते. मात्र कचरा ठेकेदान भरपावसात उघड्या गाड्यांमधूनच कचऱ्याची वाहतूक करत आहे. त्या दुर्गंधीने वसईकरांचे डोके उठले असून साथीच्या रोगांचा फैलाव होण्याच्या मोठा धोका निर्माण झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख काकासाहेब मोटे यांनी या गंभीर बाबीकडे पालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. स्वच्छत विभागाचे उपायुक्त, अतिरिक्त सहाय्यक आयुक्त आणि स्वच्छता निरीक्षक याकडे का दुर्लक्ष करत आहेत असे सवाल करतानाच जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, अशी मागणीह काकासाहेब मोटे यांनी केली आहे.


































































