चक्रीवादळामुळे चीनमध्ये विमाने रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनमध्ये डॉल्फिन चक्रीवादळाचा धोका वाढला आहे. चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाच्या इशाऱयामुळे शांघायमधील दोन प्रमुख विमानतळांवरील 1300 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने झेजियांग प्रांतातील सुमारे 3.9 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. तसेच शांघायमधील धोक्याच्या पातळीवरील 30 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत बाधित भागात 200 ते 400 मिमीपर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.